Monday, September 3, 2007

मी

मी...

तुझ्या तळहातावरील
चमचमणार्या रुपेरी वाळूसारखा...

मूठ वळलीस तर
बोटांच्या फटीतून
भुरुभुरु निसटणारा...

मूठ न वळता
तुझ्या मऊसर तळहातावर
कायमचा विसावणारा...!

1 comments:

जयश्री said...

अरे वा.... शेवटी केलास ना ब्लॉग सुरु........बरं झालं....आता तुझ्या सगळ्या कवितांचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येईल आम्हाला.
तुला खूप खूप शुभेच्छा !!