
तृप्त एकांताचे तळे
त्यात उठला तरंग
शिरशिरी पाण्यावर
मोहरले अंतरंग
हळुवार फिरविले
बोट वा-याने जळात
तळ नितळ तळ्याचा
डहुळला जरासाच
आर्जवित वारियाने
ढवळले सारे तळे
कश्या लाटेवरी लाटा
काही तळ्याला नाकळे
कोण वारा? कोण तळे?
असे वादळ उठले
जाळ वा-याचा जळात
तळे धावत सुटले !!!
त्यात उठला तरंग
शिरशिरी पाण्यावर
मोहरले अंतरंग
हळुवार फिरविले
बोट वा-याने जळात
तळ नितळ तळ्याचा
डहुळला जरासाच
आर्जवित वारियाने
ढवळले सारे तळे
कश्या लाटेवरी लाटा
काही तळ्याला नाकळे
कोण वारा? कोण तळे?
असे वादळ उठले
जाळ वा-याचा जळात
तळे धावत सुटले !!!
4 comments:
सुंदर, अति सुंदर.
जाळ वाय्राच्या जलांत तळे धावत सुटले
काय कल्पना आहे
waah!!
"कोण वारा? कोण तळे?
असे वादळ उठले
जाळ वा-याचा जळात
तळे धावत सुटले !!!"
atishay sundar...
सुंदर
जाळ वाऱ्याचा जळांत....
जियो!
महानोर would have been proud of these three words....
Post a Comment