Monday, December 3, 2007

नफरतका रिश्ता

मध्यंतरी एका ओळखीच्या माणसाबरोबर माझं चांगलंच वाजलं. त्याच्या कृतीचा
मला साधासुधा राग नव्हे तर सात्विक संताप आला होता. मी चांगला खरमरीत
फोन करुन यापुढे माझ्याशी संबंध ठेवू नकोस असे निर्वाणीचे त्याला बजावले.

त्यानंतर बोलण्याच्या ओघात एका मित्राजवळ त्याचा विषय निघाला. झालं...
परत तो सगळा प्रसंग मला आठवला आणि मी त्याच आवेशाने, सात्विक
संतापाने मित्राला झालेली घटना सांगीतली. त्यात "how can he behave
with me like this?" हाच भाव जास्त होता. त्यानंतर जेव्हा कधी ग्रुपमध्ये
त्याचे नाव निघायचे, कुठे कोणी उल्लेख केला की झालेला प्रसंग आठवून
माझा अगदी तिळपापड व्हायचा.

खरं तरं त्याने कसं वागावं हा माझ्या दृष्टीने uncontrollable factor होता
पण ते काही केल्या माझ्या लक्षात येत नव्हते " त्याने असं वागताच कामा
नये how can he?" इथेच माझी गाडी अडकून पडली होती.

दोन महिन्यांनी मित्राचा फोन आला. त्या ओळखीच्या माणसाविषयी त्याने
काहीतरी वाक्य उच्चारले तेव्हा मी जरा रागातच त्याला म्हटले
" तुला माहीत आहे ना काय झालंय ते... मग मला नको काही सांगूस. मला अगदी
तिरस्कार वाटतो त्याचा"
"ok ok" म्हणून त्याने दुसरे बोलणे सुरु केले.

माझा राग थोडा शांत झाला होता. परत एक महिन्यानी त्या मित्राचा फोन आला
तेव्हा परत त्याने त्याचे updates मला दिले. मी परत मूळपदावर...
तेव्हा मित्र म्हणाला " संबंध संपले म्हणतेस ते खरंच खरं आहे का ग?
"मग तुला चेष्टा वाटते की काय सगळी" मला आता मित्राचा राग यायला सुरुवात
झाली होती.
"नफरत का रिश्ता भी रिश्ता होता है भई" तो हसत हसत म्हणाला.
"चल उगाच फिल्मी डॊयलॊग मारु नकोस" असे म्हणून मी विषय बदलला.

...

स्वगत -

(हं... नफरतका रिश्ता भी रिश्ता होता है.... पॊईंट है इसमे...
मी म्हणते आहे खरी की संबंध संपले पण खरंतर अजूनही माझ्या मनात
त्याच्याविषयीचा राग आहेच की...
मग संबंध संपले म्हणण्याला काय अर्थ आहे?
अजून माझ्या भावविश्वातला काही भाग त्याने (negative का होईना)
व्यापलेला आहे... हे बरोबर आहे का?
Why do i allow him to occupy such space? हे काही बरोबर नाही राव...
हे सगळं मनातून पुर्णपणे गेलं पाहीजे.....
गेलं पाहीजे हे बरोबर आहे पण मला त्याचा सॊलिड म्हणजे सॊलिड राग आला
आहे त्याचं काय?
हो पण हे सगळं करायला परमिशन कोण देतय? आपणच ना?
आपल्याच तर हातात आहे त्याला किती space occupy करु द्यायची ते...
हो तेही बरोबर आहे..)
....

आता त्याचा रागापेक्षा ह्या space occupation चा मला जास्त त्रास व्हायला
लागला होता. आणि मजा म्हणजे हे सर्व माझ्याच हातात आहे हे कळून मला
वळत नव्हते.
अश्या मजेशीर आंदोलनातून मी खरंच काही दिवसांनी त्याच्याशी संबंध
(मनातून) कायमचे तोडले. :) एकंदर process खूप म्हणजे खूप enjoy केली.
अगदी irritation सकट.

...

आज असे वाटते आहे की त्याच्यासारखी परत कोणीतरी माझ्या मनातली
space negatively occupy केली तर मी काय करीन?
धामणस्करांनी सांगीतल्याप्रमाणे ’ कणवपूर्ण हृदयाने’ बाजूला होईन,
की पूर्ण विरोधात उभी ठाकीन,
की अगदी sportingly "नफरत का रिश्ता भी रिश्ता होता है भई"
असे म्हणीन
आहे खरं एक भलं मोठ्ठं प्रश्न चिन्ह..... ?

16 comments:

HAREKRISHNAJI said...

खरय. ही व्यक्‍ती आपल्याशी अशी का वागली या विचाराचाच त्रास जास्त होते.

स्मरणशक्ती ही शक्ती आहे का विस्मरण ही ताकद आहे ?

a Sane man said...

:)

khara aahe kiti space dyayachi he aaplyach hatat aahe...ni jara vichitrach aahe...

mhanje manatun kadhunach takla poorna...ki mag nafrat suddha rahat nahi...mag jar nafratach nahi tar mag ha poorNapaNe space nakaraycha khaTatop suddha vyarthach houn jato...shevti fakt aapaN swatahavarach hasayacha...:)

Nandan said...

mast. process, lekhabarobarach label hi aavaDala :). man manaas umagat nahi nantaracha admaas kashcha ghyava ha prashnahi tasa awaghadach.

Ashish K. said...

When we can forgive ourselves in spite of our thousands of mistakes, how can we hate someone at the glimpse of few mistakes.

- Swami Vivekananda

Kshipra said...

harekrishanaji, sane man, nandan and ashish,

dhanyavaada.

@a sane man,

blog delete jhaalyaache vaaiit vaatale.

Tejaswini said...

khup chhan!

malahi kadhi hi goshta janavali navhati! "nafrat ka rishta bhi risha hota hain" sahich!

a Sane man said...

Hi, my blog is still there. I just changed the associated gmail account, so you may not be able to access it by clicking on my profile (the one which I used to comment here). But, following is the link:
http://www.asanemanthinks.blogspot.com/

:)

Kshipra said...

@ tejaswini,

thanx. malahi adhi ase jaaNavale nahvate.

@a sane man,

sane man asa kahi vaagel asa vaatala navhata mala. :)

Samved said...

रंजीश ही सही...

Monsieur K said...

"nafrat ka rishta bhi rishta hota hain" :)
liked the way u ask yourself if history repeats itself in case of another person, would u react the same way.. kharach ek prashna-chinha aahe..
as nandan says, even the tag/label is very apt for this post!

Lopamudraa said...

खरय क्षिप्रा, सुंदर लिहिलय,
माझ तर खुपदा अस झलय की मनातली जास्त जागा अशा व्यक्तींनीच व्यापली मग वाटले की हा " नफ़रत का रिश्ता च" जास्त जागा व्यापुन आहे हे चुकिचे आहे.बदलले पाहैजे.

परागकण said...

kyaa baat hai !

sahaj .. aaNi praamaaNik!

HAREKRISHNAJI said...

अभिनंदन आजच्या "मराठी बॉग विश्व", चतुरंग , लोकसत्ता मधे आपल्या बॉग बद्द्ल फार चांगले लिहुन आले आहे.

http://www.loksatta.com/

Samved said...

http://loksatta.com/daily/20080119/ch10.htm

Kshipra said...

harekrishnaji and samved,

dhanyawad.

जयश्री said...

क्षिप्रा.... "नफ़रतका रिश्ता" अगदी नावासकट आवडलं.
माझ्यापुरतं म्हणशील ना.... तर मी लवकर माफ़ करु शकते आणि पुन्हा तितक्याच प्रेमाने त्या व्यक्तिशी बोलू शकते :) खूप जण त्याला माझा वेडेपणा समजतात. पण माझी गाडी मात्र त्याच रुळावरुन जाते. त्यामुळे negative space occupying ची माझ्या बाबतीत शक्यता थोडी कमी आहे.