Friday, February 1, 2008

निराकार

का एवढं जीव तोडून प्रेम करतेस माझ्यावर?
तुझा नेहमीचा प्रश्न

(कसं सांगू तुला?
मी, एक क्षुद्र मानवी जीव
निसर्गातली निराकारता सोसवत नाही
मग मनाला आकाराची ओढ लागते
पण
एक लक्षात ठेवशील,
तू...
केवळ एक निमित्त
खरी पूजा
त्या निराकाराचीच
तुझ्या रुपात बांधलेली...!!!)

9 comments:

a Sane man said...

aavadali kavita!

HAREKRISHNAJI said...

आपण एक तत्वज्ञानच मांडलय या कवितेमधुन
किती मनाला भिडतो हा साकारनिराकाराचा भासाअभास

Samved said...

क्षिप्रा, एक महीना होईल आता. नविन काही तरी लिही

Kshipra said...

a sane man, harekrishanaji

thanx.

samved,

mar/apr mulaanachya exam and in may i have my own exam, tyamule avaghad vaatatay mala. so dekhenge. will keep in mind.

Prakash Ghatpande said...

आम्ही बी निर्गुन निराकार. पन लोकान्ला औघाड जाया लागल म्हनुन सगुन साकार व्हाया लागतय.

Kshipra said...

:)

Jaswandi said...

मस्त आहे! कविता आवडली खुप!

जयश्री said...

आह..... क्या बात है!

Prasanna Shembekar said...

maar Dalaa !!