दिशांचे पहारे असे जीवघेणे
कसे व्हायचे सांग भेटीस येणे
सुनी सांजवेळा जराशी उदासी
मुक्या आठवांची सरेना असोशी
उराशी पुन्हा तेच गाणे विराणे
जुने सूर ओढाळ आता कशाला ?
जपावे किती मोह होई मनाला
कुणी सोडवावे खुळे हे उखाणे
धुक्याच्या प्रवाही उभा एकटा मी
तुझा गंध दाटून ये रोमरोमी
वळावे कसे पाय झाले दिवाणे
Friday, September 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
mastach aahe :)
क्या बात है!
क्या बात है ? बहोत खूब !
छान झालीये..
कवितेपेक्षा छानसं गीत झालंय हे!...छान!
mints, sumedha, prasanna, samved and sane
thanx.
sane, kharaya. gaaNa jhaalaya.
kya baaat hai !!
आई शपत! झकास!!
च्यायला मला अशी एखादीही कविता जमली तर मी समाधी घ्यायचा सिरियसली विचार करीन! :))
Post a Comment