Monday, December 15, 2008

शुध्द सारंग

कितीदा तुला बोलावलं संध्याकाळी
पण
तुझं येणं कधी झालंच नाही
शुध्द सारंगासारखी
तू यायचीस
भर दुपारी
अन माझ्या तप्त तनामनावर
सावली धरायचीस
थंडगार हवेची झुळूक होऊन
माझ्यावर रेलायचीस
शुध्द मध्यमातून
मोकळी होत होत
माझ्यातल्या अपार्थिवाला
आपलं सारं तनुत्व
अर्पण करायचीस
विलंबित लयीतून
थकवा दूर करणारी
कोमल निषादाची शिंपडण
करीत करीत...
झिरपत रहायचीस
सावकाश...
माझ्यातून...
स्व:ततून...
अवघ्या विश्वातून...!!!

4 comments:

Innocent Warrior said...

मस्तच.
खूप खूप छान लिहिले आहेस.

-अभी

Samved said...

छान झालीय पण अजून थोडं लिहायला हवं होतं. बघ वृदांवनी सारंग लिहीता आला तर (आईशप्पत..किती दिवसांनी आठवला हा राग!)

Prashant K said...

अप्रतिम!

HAREKRISHNAJI said...

नैना ना माने मोरा