गर्द तमातून पुढ्यात येते
अंधुक धुसर धुरकट काही
माग तयाचा शोधू जाता
परि ते हाती गवसत नाही
अदृश्यातून खुणावते ते
सतत निरंतर हाका देते
अनाकार भेसूर काहीसे
खोल तळाशी जन्मा येते
गहिरा अनवट गोफ तयाचा
हलके हलके आणिक पिळते
अगम्य वाटा अतर्क्य भविष्ये
ज्यातून केवळ दु:खच गळते
Tuesday, October 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
aavadali kavita.
क्या बात है
अदृश्यातून खुणावते ते
सतत निरंतर हाका देते
अनाकार भेसूर काहीसे
खोल तळाशी जन्मा येते
हे चपखल झालंय खूप! "सतत निरंतर" ही अर्थपुनरावृत्ती पण आवडली... एकाला काळाचं माप आहे नि एकाला (एका अर्थी) स्थळाचं...तुझ्या मनात काय होतं?
’अनाकार’ हा शब्दही काय मस्त सुचलाय तुला!
kranti, harekrishnaji and sane,
thanx.
sane, tu mhaNatos techa manat hota majhya.
मस्त!
सतत निरंतर per say अर्थपुनरावृत्ती नाही. अर्थाची सुक्ष्म वेगळी छ्टा आहे. सतत म्हणतो तेव्हा त्यात किचिंत का होईना पण लॅग असतो. निरंतर म्हणजे नो लॅग. दोन्हीचा एकत्र परिणाम म्हणजे त्या हाकांमधली आर्तता आणि निकड जाणवते आहे असं मला वाटतं
kyaa baat hai! xipra
kitee divasani kahi wachal tujhyakadun
kShipra kavitaa aavadalee
thanx to all
manik, sorry tujhee comment chukun delete jhali.
Post a Comment