सतावणारे काही प्रश्न
१. खूप छोटा बदल घडवण्यासाठी खूप मोठा विरोध का होतो?
२. कौटुंबिक किंवा सामाजिक दबावाखाली मी मानत असलेल्या मूल्यांशी विसंगत कृती करायची वेळ आली की मनाची दोलायमान अवस्था का होते? (ठाम रहाण्यासाठी किंमत देण्याची मनाची तयारी असताना देखील)
३. मला पटलेले विचार वैयक्तिक आयुष्यात अमलात आणण्यासाठी मी आग्रही असावे की नाही?
४. मी आग्रही असले तर त्याचवेळी मला, मला पटलेल्या विचारांवर ठाम रहायचं आणि शिवाय मनातून जे तुटलेपण जाणवतं ते देखील येऊ द्यायचं नाही - हे कसं जमायचं?
उत्तरे नक्की मिळतील फक्त कधी ते माहीत नाही :)
Wednesday, January 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
18 comments:
तू माझ्या मनातलं का लिहीलंयस? :)
शेवटी ही उत्तरं ज्याची त्यानेच शोधायची! प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, आजूबाजूचे घटक वेगळे... परिस्थिती हाताळण्याची प्रत्येकाची हातोटी वेगळी. एक standard असं उत्तर असतं तर किती बरं झालं असतं ना, असं वाटतं. याचबाबतीत नाही तर इतर बऱ्याच प्रश्नांच्या बाबतीत :)
अजून गहन प्रश्न म्हणजे पौड रोड कधी पुर्ण होईल? रस्ते अजून कितीक तुंबतील? मेट्रो की बुलेट ट्रेन, नक्की आपल्या नगर"सेवकांना" कुठे पैसे जास्त खाता येतील?
हं. फार फार कठीण असते हे सारे. आपल्या मनाशी प्रामाणिक रहाणे खुप अवघड. मग विक्षिप्तपणाचे लेबल लावले जाते. इतरांची विचार करण्याची कुवतच जर कमी असेल तर केवळ अज्ञानापोटीच सारे विरोध केले जातात. एकाच पढडीतला विचार करण्याची सवय झालेल्यांना त्यावेगळा लहानसा देखिल विचार सहन करणे शक्य नसते.
मग सतत आपल्याला केवळ या लोकांपायी आपल्यामना विरुध्द गोष्टी कराव्या लागतात. मह घुसमटुन जाते
प्रश्न पडणे हे तर जिवंत असल्याचे लक्षण आहे. नुसतेच सजीव असून काय उपयोग..??
१. खूप छोटा बदल इतरांसाठी खूप मोठा असला तर?
२. मुल्ये महत्वाची कि कौटुंबिक दबाव महत्वाचा कि सामाजिक दबाव महत्वाचा? याचा विचार केलाय कधी?
३. आयुष्य कोणाचे? पटलेल्या विचारांची किंमत किती?
४. पोहायच तर आहे पण पाण्यात उतरायचा नाही असे जमेल का?
thanx to all for comments.
@ अनिरुध्द,
१. हा प्रश्न माझ्याबाबतीत आहे. इतरांचे वागणे हा माझ्या दृष्टीने uncontrolled factor आहे. स्वताला तो छोटा बदल घडवणे किती महत्वाचे आहे हे पटवणेच कधी कधी खूप कठीण होते.
२. विचार नक्कीच झाला आहे. मी मानत असलेली मूल्ये, कौटुंबिक दबाव आणि सामाजिक दबाव ह्यात प्राधान्यक्रम ठरवतांना अडचण येते आहे किंवा असे म्हणु शकते की ठरवलेला प्राधान्यक्रम तपासून बघावासा वाटतो. नवीन ठरवलेला प्राधान्यक्रम सातत्याने मनाला बजावावा लागतो.
३. तीन आणि चार प्रश्न एकमेकात गुंतलेले आहेत. माझी किंमत देण्याची तयारी असली तरी,प्रत्यक्ष कृती करताना मनाची घालमेल अटळ आहे. केवळ काहीतरी वेगळं करायचं आहे (attention seeking behavior)/ केवळ विरोधाला विरोध नाही ना? हे वारंवार तपासावे लागते. पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यावर पहिल्यांदा पाणी खूप गार लागणार, थोडी भीती वाटणार ह्यातून सुटका नाही.
हे explanation पुरेसे वाटतयं का?
explanation पुरेसे आहे का? हे तूच ठरव. माहिती असलेले व थोडेसे ताब्यात असलेले हे एकच आयुष्य आहे. कधीतरी तळ्यात मळ्यात हा प्रकार सोडून द्यावा (मला जमलेले नाही, पण प्रयत्न मात्र जोरदार करतोय.) झोकून द्याव. मुक्तपणे वागाव. तळ्यात माल्यातला प्रकार आपल्याला माहिती आहे. झोकून देणे काय आहे याचा अनुभव तर घ्यावा!
anirudha, good thought.
prayatna aikayala aavadateel.
सामाजिक प्रश्न सहजासहजी सुटण कठीण आहेत. त्यामुळे सध्या छोटं कोडं टाकलय.
तुला खो दिलाय. तो घे
खो खो खो खो खॊ
ahe laxat
"च्या मारी,इतकं जड जड नका हो लिहू डोक्याला नसता भुंगा लागतो."असं म्हणूच शकत नाही.सालं थोडंस का होईना अस्वस्थ झालचं पाहिजे/नव्हे करता आलच पाहिजे.झालं/केलं
ऑल द बेस्ट.......
क्षिप्रा,अजून एक सांगू? हे अप्रोवलच झेंगट काढून टाक.जास्तीच जास्त काय होईल? एखादा म्याड क्वचित एखादे वेळीच गाढवा सारख(म्हणजे खरेतर ह्यात त्या बिचाऱ्या गाढवाचाच अपमान आहे पण काहीच सुचल नाही म्हणून त्याला बळी दिला,काही तरी लिहायची शक्यता आहे.मी शक्यताच म्हणतोय अजून पण कायम हीच भीती मनात ठेऊन चालणार नाही. थोड बिनधास्त हो. तुझ्या हातात त्याचा ID कायमचा ब्लॉक करायचं आता हत्यार दिलंय,पण आमची कॉमेंट लगेच दिसली नाही तर नर्व्हस व्हायला होत गं.बघ विचार कर ह्याच्या पलीकडे तर तू पण आणि आम्ही पण काहीच करू शकत नाही.आणि वेळ प्रसंगी चुकून माकून 'योग्य' टीकेला समोर जावच लागल तर लढ. पण लपून वार नको करू.कारण कॉमेंट अप्रोवल म्हणजे आम्हाला तू आमच्यावर विश्वास नसल्याचे अगदी उघडपणे सांगण्या सारख आहे गं.
thanx mynac. will think abt ur suggestion
खूप काळाने ब्लॉग वाचला... आणि ह्म्म्म!
'Brida' by Paulo Coelho नक्की वाच!
ब्लॉग जबरी! खूप नाव वाचलं होतं तुझं जुन्या मायबोलीवर अन कविताही! खूप शुभेच्छा लिखाणासाठी आणि जीवनातल्या प्रवासासाठी सुद्धा! :)
manik and giri thanx ! brida vachin
Post a Comment