Friday, January 20, 2012

नाते तुझे नि माझे

नाते तुझे नि माझे केव्हातरी जुळावे
शब्दात सूर तेव्हा उमलून मोहरावे

जागेपणी सुरांचा लाडिक ध्यास लागे
ओठात धून येता डोळ्यात स्वप्न जागे
काहूर दाटलेले त्याला कसे कळावे

कोणास ना दिसावे हे बंध कोणते रे
संकेत जाणणारे ते गंध सांग ना रे
पाहून ओढ वेडी आकाश ही झुकावे

हृदयात आस आहे प्रत्यक्ष भेट व्हावी
हलकेच भावना अन मौनातुनी कळावी
नादावल्या क्षणांचे धुंदीत गीत व्हावे

6 comments:

केदार said...

क्षिप्रा, आपली ही रचना मला आवडली. एक चांगले गीत झालेले आहे. हा जो कोणी आहे गीतात, त्याने गीत वाचले तर त्याच्यापर्यंत भावना नक्की पोचतील.अर्थात, तो तितका रसिक हवा.
..इतर काय लिहिता ?

Kshipra said...

kedar, dhyanavad. kavita lihite baki kahi nahi

Ruminations and Musings said...

Awadali kavita.. !

Samved said...

Don't you think, you need to write more? 2007 (13), 2008 (10),
2009 (5), 2010(1), 2011 (2)....

kshipra said...

नीलांबरी, धन्यवाद

Kshipra said...

samved, paTataya.